मुंबई : आयपीएल (IPL 2022) मध्ये आज 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. बंगळुरूकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 73 धावा केल्या.
Innings Break!#RCB post a formidable total of 192/3 on the board, courtesy a captain’s knock from Faf du Plessis and a terrific cameo from Dinesh Karthik.
Follow the match 👉 https://t.co/tEzGa6a3Fo #TATAIPL pic.twitter.com/FiGtlJdbvH
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर विराट कोहलीची विकेट गमावल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी मिळून संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी वेगवान शतकी भागीदारी केली.
रजत 48 धावांवर बाद झाला तर डु प्लेसिसने नाबाद 73 धावांची खेळी केली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांनी दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 3 बाद 192 पर्यंत नेली. मॅक्सवेलने 24 चेंडूत 33 धावा केल्या, तर कार्तिकने 8 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकात बंगळुरूने 25 धावा पटकावल्या. फजलहक फारुकीच्या या षटकात दिनेश कार्तिकने सलग तीन षटकार आणि एक चौकार लगावला. सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजीत जगदीश सुचित ने 4 षटकांत 30 धावा देताना 2 तर कार्तिक त्यागी याने 4 षटकांत 42 धावा देत 1 विकेट घेतली.