Royal Challengers Bengaluru, IPL 2024 Playoffs Equation : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा सीझन आतापर्यंत खूपच खराब राहिला आहे. संघाने 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. 7 सामने गमावल्यानंतर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे की इथून आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का? चला तर मग जाणून घेऊया बंगळुरूच्या पात्रतेचे गणित काय सांगते.
आत्तापर्यंत बंगळुरूने आयपीएल 2024 मध्ये 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळाला आहे. एका विजयासह, RCB 2 गुण आणि -1.046 च्या निव्वळ धावगतीने गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत 10व्या स्थानावरून थेट टॉप 4 मध्ये पोहोचणे संघासाठी सोपे नसेल. त्यामुळे आरसीबी अजूनही पात्र ठरू शकेल का? चला समजून घेऊया.
RCB चे पात्रता समीकरण काय आहे?
पहिली गोष्ट म्हणजे पात्रता मिळवणे आता आरसीबीच्या हाताबाहेर गेले आहे. म्हणजेच आता त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. आरसीबीला या मोसमात अजून 6 सामने खेळायचे आहेत. जर संघाने सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 14 गुण होतील. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही संघाला किमान 16 गुणांची आवश्यकता असते. मागील हंगामात म्हणजेच 2023 IPL मध्ये, RCB ने 14 गुण मिळवले होते, परंतु संघ पात्र ठरू शकला नाही.
1.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांचे पुढील 6 पैकी 6 सामने जिंकावे लागतील. तेव्हा ते 14 गुणांवर पोहोचतील. मात्र, 14 गुणांनंतरही त्यांना शेवटच्या 4 मध्ये स्थान मिळू शकत नाही. कारण, इतर संघांचा रनरेट जास्त आहे.
2. अशा परिस्थितीत पात्र होण्यासाठी आरसीबीला आधी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. जर संघाने उर्वरित सामन्यांपैकी एकही गमावला तर त्यांना पात्रता मिळणे अशक्य होईल.
3. सर्व सामने जिंकल्यानंतर, संघाला आशा करावी लागेल की इतर संघांचे निकाल आपल्या बाजूने लागतील, जेणेकरून ते 14 गुणांसह टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकतील.
IPL 2024 : दाम कमी पण काम मोठे..! अवघ्या 20 लाखांत ‘हे’ खेळाडू करतायेत करोडोंची कामगिरी…
4. बंगळुरूला पात्र ठरायचं असेल तर, गुणतालिकेतील पहिले तीन संघ 1. राजस्थान(7 पैकी 6 विजय,12 गुण), 2. कोलकाता (7 पैकी 5 विजय,10 गुण) आणि 3. हैदराबाद (7 पैकी 5 गुण,10 गुण) पात्र ठरतील असं मानू. त्याबरोबरच असं घडूनही बेंगळुरू संघाला सीएसके आणि एलएसजीवर अवलंबून राहावं लागणार आहे. गुणतालिकेत सीएसके (7 पैकी 4 विजय,8 गुण) आणि एलएसजी (7 पैकी 4 विजय, 8 गुण) हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमाकांवर आहेत. अशा या दोन्ही संघांना पुढील 7 सामने जिंकण्यापासून रोखावे लागणार आहे.
5. CSK आणि LSG या दोन्ही संघांचे 7-7 सामने बाकी आहेत. जर या दोन्ही संघांनी जास्तीत जास्त 2-2 सामने जिंकले आणि उर्वरित 5 सामने गमावले आणि जर का RCB ने सर्व सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. आता पात्रतेच्या शर्यतीत बेंगळुरू किती मजल मारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.