मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एक अनोखा विक्रम साकार करण्याची संधी मिळाली आहे. या दोन संघात परतीच्या फेरीचा सामना पुढील महिन्यात होणार असून, त्यात जर कोहलीने 52 धावा केल्या, तर तो चेन्नईविरुद्ध 1 हजार धावा करणारा दुसराच फलंदाज ठरेल.
कोहली हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 6 हजार 389 धावा केल्या आहेत. त्याने 2016 सालच्या हंगामात 950 धावा करत विक्रम केला होता. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएलमध्ये 1 हजार धावा केल्या आहेत.