नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा पिता होणार आहे. होय ही माहिती त्याचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने दिली आहे. खरंतर, विराट कोहलीने सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. त्याचवेळी १५ फेब्रुवारीपासून तिसरी कसोटी होणार असून त्यात तो खेळणार की नाही याबाबत सस्पेंस आहे.
दरम्यान, विराट खेळत नसल्याच्या कारणाबाबत सोशल मीडियावर विविध अंदाज बांधले जात आहेत. वास्तविक, शनिवारी एबी डिव्हिलियर्स भारत आणि इंग्लंड कसोटीनंतर त्याच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह आला होता.
AB De Villiers said, “Virat Kohli and Anushka Sharma are expecting their 2nd child, so Virat is spending time with his family”. (AB YT). pic.twitter.com/qurRKnFK1q
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 3, 2024
दरम्यान, एका चाहत्याने विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला असता, एबी डिव्हिलियर्सने सांगितले की, त्याने विराटला फोन करून त्याची तब्येत विचारली होती. यानंतर विराटने सांगितले की, तो त्याच्या कुटुंबासोबत आहे. डिव्हिलियर्स पुढे म्हणाले की, त्याचे दुसरे अपत्य वाटेवर आहे. या कारणास्तव तो कुटुंबासोबत आहे. ही माहिती समोर येताच चर्चेला सुरुवात झाली आहे.