कोलकाता : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. लीग टप्प्यातील अव्वल दोन संघ गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात प्लेऑफचा पहिला क्वालिफायर खेळला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर नाणेफेक जिंकून राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@hardikpandya7 has won the toss & @gujarat_titans have elected to bowl against @rajasthanroyals.
Follow the match ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/vU3rmlVXRP
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
राजस्थान संघाने आजच्या सामन्यात कोणताही बदल केलेला नाही. एक बदल करत गुजरात संघाने अल्झारी जोसेफला संधी दिली आहे. लोकी फर्ग्युसनच्या जागी अल्झारीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11 :-
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, रिद्धिमान साहा (Wk), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (C&Wk), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल, प्रणीक कृष्णा