IND vs SA 2nd ODI Toss update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) खेळवला जात आहे. गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. जोहान्सबर्गमधील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना जिंकल्यास मालिकेत अजिंक्य आघाडी घेईल.
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने भारताकडून पदार्पण केले आहे. श्रेयस अय्यर कसोटी संघात सामील झाला आहे. तो या सामन्यात खेळत नाही.
🚨 Toss & Team News
South Africa elected to bowl and here’s India’s Playing XI for the second ODI 🔽
Follow the Match ▶️ https://t.co/p5r3iTdngR#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/hB9h1XUBrm
— BCCI (@BCCI) December 19, 2023
भारताचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला पदार्पणाची संधी मिळाली आहे. नाणेफेकीपूर्वी कुलदीप यादवने त्याला वनडे कॅप दिली. त्याने याआधी टी-20 मध्ये पदार्पण केले आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाच्या बाजूने गेला. टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रोटीज संघाला ताकद दाखवावी लागणार आहे. त्याच्यासाठी हा ‘करा किंवा मरो’ चा सामना असेल.