Lok Sabha Election 2024 first list of Eknath Shinde’s Shiv Sena – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रातील लोकसभा जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या यादीत आठ पैकी सात विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मात्र, पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही. शिवसेनेला लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती जागा मिळणार, याबाबत अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. असे असताना एकनाथ शिंदे यांनी केवळ आठ उमेदवारांची नावांची घोषणा केली आहे.
शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर मतदार संघातील प्रमुख लढती –
1) कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज (काँग्रेस)
2) मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिंदे शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (उबाठा)
3) शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिंदे शिवसेना) विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे(उबाठा)
4) बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिंदे शिवसेना) विरुद्ध प्रा. नरेंद्र खेडेकर(उबाठा)
5) हिंगोली – हेमंत पाटील (शिंदे शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर(उबाठा)
6) मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे पाटील(उबाठा)
7) रामटेक – राजू पारवे (शिंदे शिवसेना) विरुद्ध रश्मी बर्वे (काँग्रेस)
8) हातकणंगले – धैर्यशील माने (शिंदे शिवसेना) –