IPL Auction 2024 : IPL 2024 या स्पर्धेसाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. अलीकडेच, आयपीएल संघांनी त्यांच्या संबंधित राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या (Retained And Released) खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयकडे सादर केली. या लिलावापूर्वी अनेक संघांनी आपले मोठे खेळाडू सोडले. या यादीत अनेक वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. तथापि, त्या वेगवान गोलंदाजांवर एक नजर टाकू ज्यांच्यासाठी लिलावात बोली युद्ध पाहिले जाऊ शकते, याचा अर्थ या गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडू शकतो.
1. जोफ्रा आर्चर
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने सोडले (Release) आहे . त्याच्या वेगवान चेंडूंव्यतिरिक्त, जोफ्रा आर्चर शेवटच्या षटकांमध्ये त्याच्या शानदार यॉर्कर्ससाठी प्रसिद्ध आहे. आयपीएल लिलावात अनेक संघ जोफ्रा आर्चरच्या मागे जाऊ शकतात. असे झाल्यास जोफ्रा आर्चरवर पैशांचा पाऊस (जास्त बोली) पडणार हे निश्चित.
2. मिशेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आयपीएल 2015 पासून खेळलेला नाही. अलीकडेच मिशेल स्टार्कने विश्वचषकात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याचवेळी, यावेळी मिशेल स्टार्कचा आयपीएल लिलावात सहभाग निश्चित मानला जात आहे. जर मिशेल स्टार्क आयपीएल लिलावाचा भाग असेल तर संघ या वेगवान गोलंदाजाला संघात घेण्यासाठी संघमालक मोठी बोली लावू शकतात.
3. लॉकी फर्ग्यूसन
कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला (Release) सोडले आहे. कोलकाता नाइट रायडर्स व्यतिरिक्त, लॉकी फर्ग्युसन आयपीएलमध्ये पुणे रायझिंग सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळलेला आहे. लॉकी फर्ग्युसन त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल लिलावात लॉकी फर्ग्युसनचा संघात समावेश करण्यासाठी अनेक संघ जोरदार प्रयत्न करतील.
4. गेराल्ड कोएत्जी
अलीकडेच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने खूप प्रभावित केले. दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत गेराल्ड कोएत्झीने 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31 बळी घेतले आहेत. त्यामुळे या लिलावात संघांची नजर गेराल्ड कोएत्झीवर असेल. या 23 वर्षीय खेळाडूवर देखील पैशांचा पाऊस पडू शकतो.
5. जोश हेझलवुड
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. नुकताच जोश हेजलवूड वर्ल्ड कपमध्ये दिसला होता. वास्तविक, जोश हेझलवुड त्याच्या लाइन लेंग्थ (अचूक गोलंदाजी) शिवाय त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमधून रिलीज केल्यानंतर जोश हेझलवूड लिलावाचा भाग असेल. जोश हेजलवूडवर अनेक संघ बोली लावतील, असे मानले जात आहे. असे झाल्यास जोश हेजलवुडला मोठी रक्कम मिळू शकते.