IPL 2024 Live Streaming & Telecast Channel : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहेत. शुक्रवारपासून (22 मार्च) 17 वा हंगाम सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मागील 16 आवृत्त्यांप्रमाणेच आगामी हंगामही तितकाच रोमांचक असेल अशी अपेक्षा आहे.
भारतात लवकरच लोकसभा निवडणुका सुरू होणार असल्याने, सध्या बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे, लवकरच बोर्ड उर्वरित सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करेल. IPL 2024 चे सामने कधी आणि कोणत्या मैदानावर खेळले जातील हे येथे तुम्हाला कळू शकते तसेच तुम्ही सामन्यांचे टेलीकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता हे देखील येथे जाणून घेऊ शकता.
आयपीएल 2024 मध्ये अनेक खेळाडू पुनरागमन करताना दिसतील. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आता डिसेंबर 2022 नंतर खेळताना दिसणार आहे. रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तो गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. मुलगा अकायच्या जन्मानंतर किंग कोहलीची ही पहिली आयपीएल असेल तर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर शुभमन गिल गुजरात जायंट्सचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवरही जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. मिचेल स्टार्क तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे.
IPL 2024 : पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक….
1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00)
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वा.)
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30)
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता)
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा)
6. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.)
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.)
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा)
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.)
10. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.)
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स (30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा.)
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (31 मार्च, अहमदाबाद, 3.30 वा.)
13. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वा.)
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.)
15. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (2 एप्रिल, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.)
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वा)
17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा.)
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा)
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा)
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता)
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा)
आयपीएल 2024 : सर्व संघांचे कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स : रुतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत
गुजरात टायटन्स : शुभमन गिल
कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या
पंजाब किंग्स : शिखर धवन
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : फाफ डू प्लेसिस
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स
आयपीएल 2024 : बक्षीस रक्कम
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या आयपीएलच्या बक्षीस रकमेची पुष्टी केलेली नाही, परंतु गेल्या वर्षीच्या विजेत्यांना 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळाले होते.
आयपीएल 2024 : टेलीकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
टीव्हीवर आयपीएल 2024 लाईव्ह पाहणारे क्रिकेटप्रेमी स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमधील सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. तुम्हाला अँड्रॉइड डिव्हाइसवर (मोबाइल, टॅबलेट किंवा टीव्ही) लाइव्ह स्ट्रीम पहायचे असल्यास, लाइव्ह सामने Jio Cinema ॲप्लिकेशनवर Free मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.