मुंबई – अमेरिकेतील सकारात्मक पत धोरणामुळे भारतीय शेअर बाजाराचे (Stock Market) निर्देशांक गुरुवारी पाऊण टक्क्यांनी वाढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य एकाच दिवसात 5.72 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. (Stock investors earned huge profits)
आता भारतीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 379 लाख कोटी रुपये म्हणजे 4.57 लाख कोटी डॉलर इतके झाले आहे. परदेशी गुंतवणूक भारतात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूक केलेल्या भारतातील गुंतवणूकदारांचे गुंतवणूक मूल्य आगामी काळात वेगाने वाढू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे काही विश्लेषकांनी सुचित केले.