Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी पुण्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची काही भेट घेतली तेव्हा पासूनच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. । Vasant More
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय राहिले आहे.
मात्र, पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे वसंत मोरे यांनी मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र करत, पक्षातून काढता पाय घेतला. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अद्याप त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही.
दरम्यान मनसे आणि भाजप युतीवरही गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरही आता वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे महायुतीत जातील की नाही हे मला माहिती नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे.
पण मनसेचे पुण्यातले जे साहेब लोक आहेत. त्यांना याबद्दल विचारा…, असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे. तर मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते.
अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं आहे. । Vasant More