IPL 2024 (RR vs CSK Match 61, Playing XI) : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकताच ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पण चेन्नईचा प्रवास सोपा नाही. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. राजस्थानने या मोसमात 8 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 6 सामने जिंकले आहेत.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज प्रथम गोलंदाजी करेल. ध्रुव जुरेलचे राजस्थान संघात पुनरागमन झाले आहे, तर महेश तिक्षनाचेही चेन्नई संघात पुनरागमन झाले आहे. चेन्नईने मिचेल सँटनरच्या जागी तिक्षानाचा समावेश केला आहे.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals win the toss and elect to bat against @ChennaiIPL
Follow the Match ▶️ https://t.co/1JsX9W2grC#TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/gwapMiGSD5
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
CSK vs RR : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे…
चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरनजीत सिंग, महेश तिक्षाना. ( इम्पॅक्ट सब : अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, अजय मंडल, मुकेश चौधरी )
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. ( इम्पॅक्ट सब : रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर कॅडमोर, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, केशव महाराज )
IPL 2024 : आयपीएल 2025 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम असेल का? जय शाह यांचं मोठं विधान, म्हणाले…
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर चेन्नई आणि राजस्थान 28 सामन्यांमध्ये भिडले आहेत. यापैकी सीएसकेने 15 सामने जिंकले आहेत तर राजस्थानला केवळ 13 सामने जिंकता आले आहेत. चेन्नईची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 246 धावा आणि सर्वात कमी धावसंख्या 109 धावांची आहे. त्याच वेळी, राजस्थानने CSK विरुद्ध सर्वाधिक 223 धावा केल्या आहेत तर 126 ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे.
हा सामना चेन्नईसाठी करो किंवा मरो असा आहे. खरे तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर रुतुराज गायकवाडच्या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सध्या CSK 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.