IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) Lucknow Super Giants, Shivam Mavi : आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना झाला. लखनौने ( Lucknow Super Giants ) हा सामना 28 धावांनी जिंकला. लखनौ संघामध्ये सलग दुसऱ्या वर्षी आरसीबीला घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा मोठा उत्सव झाला. मात्र, हा आनंद 24 तासही टिकू शकला नाही. वास्तविक, लखनौला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
शिवम मावी ( Shivam Mavi ) असे या गोलंदाजाचे नाव आहे. 25 वर्षीय शिवम मावीला IPL 2024 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने 6.4 कोटी रुपयांना विकत घेतले. रिपोर्टनुसार, मावी सीझनच्या सुरुवातीपासून पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता आणि त्यामुळेच त्याने या मोसमात आतापर्यंत एकही सामना खेळला नव्हता. मात्र, आता मावीने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मावी लखनौ सुपर जायंट्सच्या शिबिरातून (कॅम्प) बाहेर पडताना दिसत आहे.
You’ll come back stronger, Shivam. And we’re with you all the way. 💙 pic.twitter.com/zYSs3URV1p
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 3, 2024
मावीने भारतासाठी केले आहे पदार्पण…
2018 च्या अंडर-19 विश्वचषकात आपल्या स्फोटक गोलंदाजीने जगभरात विशेष ठसा उमटवणारा शिवम मावी देशासाठी 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने आयपीएलचे 32 सामनेही खेळले आहेत. मावी बराच काळ कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. मावी सतत 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो.
शिवम मावी कारकिर्द…
1. टी-20 : 6 सामने 7 बळी
2. आयपीएल : 32 सामने 30 बळी
मावी झाला आहे अनेकदा दुखापतग्रस्त…
शिवम मावीचे दुखापतीशी खूप जुने नाते आहे. कारकिर्दीत तो अनेकदा दुखापतग्रस्त झाला आहे. याआधीही मावी दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर होता. ऑगस्ट 2023 पासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. वेगवान गोलंदाजीसोबतच मावी खालच्या क्रमाने तात्पुरती (कामचलाऊ) फलंदाजीही करू शकतो.