Jyoti Mete And Sharad Pawar| शरदचंद्र पवार पक्षाकडून पाच उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली. यात बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यातच आता आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवार यांची भेट घेतली आहे.
ज्योती मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यापार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवारांशी सिल्वर ओक येथे चर्चा करत आहेत. लोकसभा उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करून दुपारी पत्रकार परिषद घेत ते या संदर्भात जाहीर घोषणा करतील. आतापर्यंत पवारांनी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आज आणखी पाच जणांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Mumbai, Maharashtra | Jyoti Mete, wife of ‘Shiv Sangram’ founder late Vinayak Mete, arrives at the residence of NCP-SCP chief Sharad Pawar to meet him. Jayant Patil also arrives here. Details awaited.
— ANI (@ANI) April 3, 2024
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे यांनी आपल्या उमेदवारीबाबत काही स्पष्टपणे सांगितलं नाही. पण लवकर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल असं सूचकपणे म्हटलं आहे. ज्योती मेटे म्हणाल्या, “सक्रीय राजकारणात पाऊल ठेवणार असल्यानं मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यासाठी शरद पवारांची आज भेट घेतली. या भेटीत माझ्या राजकारणात सक्रीय होण्याबाबत चर्चा झाली.” त्यामुळं ज्योती मेटेंची बीडमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे लढत होण्याची शक्यता
दरम्यान, ज्योती मेटे यांना बीडमधून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बीडमधून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्योती मेटे यांना बीडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: