Indian Premier League 2024 Live Cricket Score, SRH vs MI : आज आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात, पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ 2016 च्या चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर 7.30 वा सुरू होणार आहे.
तत्पूर्वी, आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने सांगितले की, ल्यूक वुड या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसणार नाही. तर क्वेना माफाका आज आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians win the toss and elect to bowl against Sunrisers Hyderabad.
Follow the match ▶️https://t.co/oi6mgyCP5s #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/DEZZk3HCHh
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मार्को जॉन्सनच्या जागी ट्रेव्हिस हेडचा समावेश करण्यात आला आहे तर टी नटराजन दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यांच्या जागी जयदेव उनाडत याला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघ मोसमातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र, दोन्ही संघ मोसमातील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
दरम्यान, आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद 21 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 12, तर सनरायझर्स हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादची सर्वोत्तम धावसंख्या 200 धावा आहे. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या 235 धावांची आहे.