Pankaja munde Beed loksabha : भाजपने बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट जाहीर केले आहे. पंकजा मुंडे यांनी देखील त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी संसदेत गेल्यावर नेमकं काय करणार याबाबत पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.
पंकजा मुंडे यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.कार्यकर्त्यांकडून देखील पंकजा यांचे ठीक ठिकाणी जोरदार स्वागत होताना दिसत आहे.बीड जिल्ह्यासाठी आपल्याकडे व्हिजन असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींकडे तरुणांसाठी एक हट्ट करणार असल्याचे देखील पंकजा यांनी म्हंटले आहे. | Pankaja munde Beed loksabha
माझ्या बीड जिल्ह्याचा चेहरा गेल्या पाच वर्षात बदलला आहे, तो चेहरा आज बघण्यासारखा आहे. आता पुढे काय करायचे ? याचे व्हिजन माझ्याकडे आहे. मी बीड जिल्ह्याचा चेहरा पाच वर्षात जो बदलला, तो आणखी देखणा कसा करता येईल? हे स्वप्न पाहते असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. | Pankaja munde Beed loksabha
“संसदेत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकच हट्ट करून बीड जिल्ह्यासाठी दहा हजार तरुणांना रोजगार कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. | Pankaja munde Beed loksabha
“त्या खिचडी चोराचा प्रचार करणार नाही..” ठाकरे गटाच्या उमेदवाराला काँग्रेस नेत्याने केला थेट विरोध
प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार ? मनोज जरांगे पाटील म्हणाले,”पाठिंबा द्यायचा..”