Chandrapur | food poisoning – चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेवण झाल्यानंतर तब्बल 100 जणांना विषबाधा झाली.
विषबाधा झालेल्यांमधील एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनानंतर 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. । Chandrapur | food poisoning
त्यानंतर या नागरिकांना या परिसरात असलेल्या वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेतली नाही । Chandrapur | food poisoning
सार्वजनिक ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषधं प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं सांगितलं. तसंच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जात असून नेमकं कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल, असंही सांगितलं आहे.