IPL 2024, Live Cricket Score (LSG vs CSK Match 34) : लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि क्विटंन डी-काॅकच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने एकतर्फी विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्जचा 8 विकेट राखून दारूण पराभव केला आहे.चेन्नईनं दिलेले 177 धावांचे आव्हान लखनौनं 6 चेंडू आणि आठ विकेट राखून सहज पार केले.या विजयासह लखनौने सात सामन्यात आठ गुणांची कमाई करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईचा सात सामन्यात चौथा पराभव झालाय.
विजयासाठी 177 धावांचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक या सलामीच्या जोडीने लखनौ सुपरजायंट्सला चांगली सुरुवात करून दिली. क्विंटन डी कॉकने कर्णधार केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली आणि संघाला आरामदायी स्थितीत नेले. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने क्विंटन डी कॉकला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. डी कॉक 43 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला.
त्यानंतर केएल राहुल यानं मोर्चा संभाळला. पण रवींद्र जाडेजानं शानदार झेल घेत केएल राहुलची खेळी संपुष्टात आणली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. केएल राहुलने 53 चेंडूमध्ये 82 धावांची खेळी केली. यामध्ये त्यान तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. राहुल आणि क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. निकोलस पूरन यानं 12 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 23 धावांची खेळी केली तर मार्कस स्टॉयनिस यानं एका चौकाराच्या मदतीने आठ धावांची खेळी केली. चेन्नईकडून रेहमान आणि पथिराणा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पण इतर गोलंदाजांना विकेट पटकावण्यात अपयश आले.
तत्पूर्वी, या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाबाद अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या होत्या.
Innings Break!
An unbeaten fifty from Jadeja & a classic finish from MS Dhoni power #CSK to 176/6 👌👌
Will #LSG chase this down?
Scorecard ▶️ https://t.co/PpXrbLNaDm#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/uBywEDcPj9
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
सीएसकेची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रचिन रवींद्र शून्यावर बाद झाला. त्याचवेळी कर्णधार रुतुराज गायकवाडलाही विशेष काही दाखवता आले नाही, त्याने 17 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. जडेजाने 40 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या आणि धोनीने नऊ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. सीएसकेसाठी या सामन्यात रहाणेने 24 चेंडूत 36 धावा केल्या, तर कर्णधार रुतुराज गायकवाडने 13 चेंडूत 17 धावा केल्या तर मोईन अलीने 20 चेंडूत तीन षटकारासह 30 धावांचे योगदान दिले.
चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 51 धावा केल्या होत्या, परंतु यादरम्यान टीमने 2 महत्त्वपूर्ण विकेट्सही गमावल्या. पुढच्या 9 षटकात संघाला केवळ 54 धावा करता आल्या, त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता येणार नाही असे वाटत होते. पुढच्या 3 षटकात रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी मिळून 37 धावा करत संघाची धावसंख्या 18 षटकांनंतर 142 धावांवर नेली. मोईन अलीने 20 चेंडूत 3 षटकारांसह 30 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर एमएस धोनीचे वादळ आले. धोनीने 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावांची तडाखेबाज खेळी केली.
लखनौ सुपर जायंट्सकडून खूप चांगली गोलंदाजी झाली. विशेषत: संघाने मधल्या षटकांमध्ये 3 विकेट घेतल्या आणि केवळ 54 धावा दिल्या. क्रुणाल पांड्याने पुन्हा एकदा प्रभावित करत 3 षटकात फक्त 16 धावा देत 2 बळी घेतले. रवी बिश्नोई आणि मोहसीन खान हे थोडे महागडे ठरले असले तरी त्यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. याशिवाय यश ठाकूर आणि मार्कस स्टॉइनिस यांनीही 1-1 विकेट घेतली, परंतु विशेषत: शेवटच्या 4 षटकांमध्ये एलएसजीच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. सीएसकेच्या फलंदाजांनी शेवटच्या 4 षटकात 63 धावा केल्या.