तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – चिकाउचो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व पिंपरी, पुणे यांनी चिकाउचो कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून हॅपी स्कूल व हॅपी अंगणवाडी या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील शिळींब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट केला. तसेच या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या – जाण्यासाठी नवीन सायकल देण्यात आल्या आहेत.
या वेळी चिकाउचो इंडिया कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी गणेश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी मिकेल मेंडीब, कंपनीचे अधिकारी वर्ग सचिन पाटील, महेश पाटील, विनय सिंगवी, पंकज मिश्रा, यतेंद्र पाठक, नागनाथ भराडे, स्मिता बसुदे, अमृता पठारे, ऋतिक चव्हाण आणि रोटरी क्लब पिंपरीचे प्रेसिडेंट अशोक माने यांनी उपस्थित होते.
सामाजिक जाणिवेची जपणूक म्हणून शाळेतील फरशी बदलणे, शाळेसाठी नवीन छत, भिंतींची रंगरंगोटी, मुलांना शालेय साहित्य वाटप करून शाळेचे पूर्ण चित्र बदलले. याबरोबरच मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर व स्वच्छतागृह दुरुस्ती करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षक वृंद व पोलीस पाटील संदीप बिडकर यांनी कंपनीची आभार मानले.