IPL 2024, Live Cricket Score (LSG vs CSK Match 34) : लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला जात आहे. लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितले की, त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. लखनौने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. ऋतुराज गायकवाड यांनी सांगितले की, डेरिल मिशेलच्या जागी मोईन अली आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर CSKने प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाबाद अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरजायंट्सने लखनौ सुपरजायंट्ससमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या आहेत.
Bring on the shine with the ball! 🔥#LSGvCSK #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/G5ZxRrWwch
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2024
सीएसकेची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रचिन रवींद्र शून्यावर बाद झाला. त्याचवेळी कर्णधार रुतुराज गायकवाडलाही विशेष काही दाखवता आले नाही, त्याने 17 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. जडेजाने 40 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या आणि धोनीने नऊ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. सीएसकेसाठी या सामन्यात रहाणेने 24 चेंडूत 36 धावा केल्या, तर कर्णधार रुतुराज गायकवाडने 13 चेंडूत 17 धावा केल्या तर मोईन अलीने 20 चेंडूत तीन षटकारासह 30 धावांचे योगदान दिले.
चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 51 धावा केल्या होत्या, परंतु यादरम्यान टीमने 2 महत्त्वपूर्ण विकेट्सही गमावल्या. पुढच्या 9 षटकात संघाला केवळ 54 धावा करता आल्या, त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता येणार नाही असे वाटत होते. पुढच्या 3 षटकात रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी मिळून 37 धावा करत संघाची धावसंख्या 18 षटकांनंतर 142 धावांवर नेली. मोईन अलीने 20 चेंडूत 3 षटकारांसह 30 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर एमएस धोनीचे वादळ आले. धोनीने 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावांची तडाखेबाज खेळी केली.
The 1️⃣0️⃣1️⃣m six that took us back to ‘1️⃣1️⃣! 🦁⏪#EndrendrumThala 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2024
लखनौ सुपर जायंट्सकडून खूप चांगली गोलंदाजी झाली. विशेषत: संघाने मधल्या षटकांमध्ये 3 विकेट घेतल्या आणि केवळ 54 धावा दिल्या. क्रुणाल पांड्याने पुन्हा एकदा प्रभावित करत 3 षटकात फक्त 16 धावा देत 2 बळी घेतले. रवी बिश्नोई आणि मोहसीन खान हे थोडे महागडे ठरले असले तरी त्यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. याशिवाय यश ठाकूर आणि मार्कस स्टॉइनिस यांनीही 1-1 विकेट घेतली, परंतु विशेषत: शेवटच्या 4 षटकांमध्ये एलएसजीच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. सीएसकेच्या फलंदाजांनी शेवटच्या 4 षटकात 63 धावा केल्या.