नैरोबी (केनिया) – केनियाचे लष्करी प्रमुख फ्रान्सिस ओगोला यांचा काल देशाच्या पश्चिम भागात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी टिव्हीवरील भाषणात ही माहीती दिली. ( Kenya army chief killed in helicopter crash )
या अपघातात लष्कराचे अन्य ९ सदस्य देखील ठार झाले. केवळ दोघे जण या अपघातात बचावले असल्याचे त्यांनी सांगितले. हेलिकॉप्टर अपघातानंतर केनियाच्या अध्यक्षांनी नैरोबी येथे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली.
गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर लगेचच हे हेलिकॉप्टर कोसळले. जनरल ओगोला गुरुवारी नैरोबीहून केनियाच्या नॉर्थ रिफ्ट प्रदेशातील सैनिकांना भेट देण्यासाठी आणि शाळेच्या चालू असलेल्या नूतनीकरणाची पाहणी करण्यासाठी निघाले होते.