KKR vs LSG Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 मध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे सतत पिछाडीवर असल्याचे सिद्ध होत आहेत. यापैकी एक नाव आहे दीपक हुड्डा, ज्याला चालू मोसमातील 3 सामन्यात केवळ 44 धावा करता आल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दीपक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण बॅटने काही चमक दाखवण्यापूर्वी तो 10 चेंडूत केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दीपक हुड्डा याला मागील 2 हंगामांसाठी 5.75 कोटी रुपये दिले गेले आहेत, परंतु “हुड्डाचा खराब फॉर्म पाहता लखनौ सुपर जायंट्सचे करोडो रूपये पाण्यात “असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हुड्डा 5व्या षटकातच फलंदाजीला आला. संयमाने मोठी खेळी खेळण्यासाठी त्याच्याकडे पूर्ण वेळ होता. पण मिचेल स्टार्कच्या चेंडूवर रमणदीप सिंगने हुड्डाचा शानदार झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हुड्डा यांच्यामुळे एलएसजीची मधली फळी कमकुवत होत आहे. आयपीएल 2023 देखील हुड्डासाठी अजिबात चांगले गेले नाही. गेल्या मोसमात त्याने 12 सामन्यांत केवळ 84 धावा केल्या होत्या.
IPL 2024 (KKR vs LSG Match 28) : सॉल्टची झंझावती खेळी, कोलकाताचा लखनौवर सहज विजय….
हुड्डाने 2022 मध्ये झळकावले होते शेवटचे अर्धशतक….
दीपक हुडाच्या खराब फॉर्मची स्थिती अशी आहे की त्याचे शेवटचे अर्धशतक 2022 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्ध आले होते. त्यावेळी हुड्डाने 39 चेंडूत 59 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर 15 डाव उलटले, पण हुड्डाच्या बॅटमधून एकही मोठी खेळी दिसली नाही. गेल्या 15 डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 धावा आहे आणि ती देखील 2022 मध्येच आली. आयपीएलमधील शेवटच्या 15 सामन्यांमध्ये केवळ 128 धावा केल्याने तो लखनऊ सुपर जायंट्सच्या मधल्या फळीतील कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध होत आहे.