कोलकाता – कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील 9 वा सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात केकेआर संघाने 81 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केकेआर संघाच्या विजयानंतर संघाचा मालक शाहरुख खान खूपच आनंदी दिसून आला आहे.
किंग खान स्टेडियममध्ये किंग कोहलीला भेटण्यासाठी मैदानावर पोहोचला. आधी मिठी मारली, गाल ओढले, आणि नंतर आणि यादरम्यान त्याने कोहलीसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या टाईटल सॉन्गवर भन्नाट असा डान्स केला. अशातच दोन्ही दिग्गजांना एकत्र पाहून चाहत्यांचे देखील मनोरंजन झाले, ज्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#ViratKohli #KKRvsRCB #KKRvRCB
Shahrukh Khan meets Virat Kohli.Two of the best from India! and both of them shaking legs for jhoome jho pathaan pic.twitter.com/PJncZL9tUK
— 👌⭐👑 (@superking1815) April 6, 2023
आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआर संघाने चमकदार कामगिरी केली आणि प्रत्येकजण संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीने खूप प्रभावित झाला. सामन्यातील विजयानंतर शाहरुख खानचा आनंद गगनात मावेनासा झाला. पठाणची झलक मैदानावर सर्वत्र दिसत होती, ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
KKR ने RCB चा 81 धावांनी केला पराभव-
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना KKR संघाने 50 धावांवर आपले तीन विकेट गमावल्या, मात्र एका टोकाकडून फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाजने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली.
यानंतर आंद्रे रसेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, मात्र रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांनी शानदार शतकी भागीदारी रचली. शार्दुलने 29 चेंडूत 68 धावा आणि रिंकूने 46 धावा करत संघाची धावसंख्या 204 पर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला आरसीबीचा संघ 17.4 षटकातच 123 धावांवर ऑल आऊट झाला आणि केकेआरचा संघ विजयी झाला.