जयपूर – आयपील 2023 चा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक संघाची आपली प्ले ऑफ मधील जागा निश्चित कारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच आज दुपारचा सामना राजस्थान रॉयल्सचा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा होणार असून हा सामना जयपूर च्या सवाई मानसिंग स्टेडियम वर खेळवला जाणार आहे.
दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. राजस्थानने गेल्या सामन्यात केकेआरचा पराभव केला होता. त्याचवेळी आरसीबीला मुंबई इंडियन्सकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतंय हे बघणं महत्वाचे ठरेल.
अशी आहे टीम…
राजस्थान रॉयल्स-
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, जो रूट, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-
विराट कोहली, फाफ डुप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, केदार जाधव, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजय कुमार वैशाख, मोहम्मद सिराज, जोस हेजलवुड.