लखनौ- आयपीएल 2023 च्या हंगामातील आजचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा रंगणार असून हा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळावला जाणार आहे. अशातच प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा जबरदस्त फॉर्म मध्ये असून त्याचा संघाला चांगल्या प्रकारचा फायदा होताना दिसत आहे. तसेच लखनौचा दिग्गज खेळाडू के.एल. राहुल हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाच्या बाहेर आहे त्यामुळे के.एल. राहुलची उणीव संघाला नक्कीच भासणार आहे.
दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये आहेत. जर लखनौने आजच्या सामन्यात मुंबईला पराभूत केले तर त्यांचे 15 गुण होतील आणि ती मुंबई खाली सरकून तिसऱ्या क्रमांकावर येईल.
पण जर मुंबई जिंकली तर तिचे 16 गुण होतील आणि ते चेन्नईला तिसर्या स्थानावर नेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. त्यामुळे आजचा सामना कोण जिकताय हे बघणं महत्वाचे ठरेल.
अशी असेल टीम…
लखनौ सुपर जायंट्स-
क्विंटन डिकॉक, काइल मेयर्स, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, युधवीर चरक, रवी बिश्नोई, अमित मिश्रा आणि आवेश खान.
मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, पीयूष चावला, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय आणि जेसन बेहरेनडॉर्फ.