हडपसर, हडपसर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीनंतर पुलावरून हलकी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी हाईट बॅरिअर बसविण्यात आले आहेत. मात्र, या हाईट बॅरिअरला वाहने धडकून वारंवार अपघात घडत आहेत. चार दिवसांपूर्वी हाईट बॅरिअरला वाहन धडकून त्याचे दोन तुकडे झाले आहेत. आता तुटलेले हे हाईट बॅरिअर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.
हाईट बॅरिअरला वाहने धडकून अपघात घडत आहेत. त्यानंतर वाहतूक विस्कळीत होत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या बाजूचा
हाईट बॅरिअरचे दोन तुकडे झाले आहेत. त्याला चार दिवस उलटले आहेत.
तरी देखील अद्याप दुरुस्ती केलेली नाही. तुटलेले हे हाईट बॅरिअर अपघातास निमंत्रण देत आहे. महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहन धडकून अपघात झाल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. काही वेळानंतर वाहतूक देखील सुरळीत झाली. मात्र,तुटलेले हे हाईट बॅरिअर अद्यापही धोकादायक अवस्थेत आहे. अपघातास निमंत्रण देत आहे. अंदाज न आल्यास वाहनधारक तुटलेल्या भागाला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे.
हडपसर : उड्डाणपूलावरील हाईट बॅरिअरला वाहन धडकून त्याचे दोन तुकडे झाले आहेत.