पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत गुजरातच्या अनादकत कर्तव्या, पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत या खेळाडूंनी 6.5 गुणांसह आघाडी कायम राखली आहे.
अश्वमेध हॉल, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत गुजरातच्या काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या अनादकत कर्तव्याने नागपूरच्या फिडे मास्टर सौरव खेर्डेकरला बरोबरीत रोखले व 6.5 गुणांची कमाई केली.
तर, पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने महिला ग्रॅंड मास्टर स्वाती घाटेचा पराभव करून 6.5 गुणांसह आपली आघाडी कायम राखली. रेल्वेच्या विक्रमादित्य कुलकर्णीने प्रियांशु पाटीलला 6 गुण मिळवले.
याशिवाय महाराष्ट्राच्या अक्षय बोरगावकर, पियुश नर्सिकर, गुजरातच्या विश्रुत पारेख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून 6 गुण प्राप्त केले.