तळेगाव दाभाडे – येथील नगर परिषदेचे विरोधीपक्षनेते गणेश काकडे यांनी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने स्वच्छता, निर्जंतुकीकरण व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांच्या विमा संरक्षण देण्याची मागणी नगर परिषदेकडे केली होती. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने गुरुवार (दि. 20) मंजुरी दिली.
आरोग्य कर्मचारी आज खऱ्या अर्थाने करोना योद्धा म्हणून भूमिका निभावत आहेत. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.
आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, आरोग्य सभापती सुलोचना आवारे, विरोधीपक्षनेते गणेश काकडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचे शाब्दिक स्वागत केले.