शिल्पा शेटीचा पतीची इडीकडून दुसऱ्यांदा चौकशी

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्याबसायिक राज कुंद्रा शुक्रवारी पुन्हा अंमलबजावणी संचनालयापुढे (इडी) हजर झाले. दाऊद इब्राहिमचा साथिदार इकबाल मिर्ची याच्याशी संबंधित जमीनीच्या व्यवहाराची काही कागदपत्रे त्यांनी सादर केली. इडीपुढे हजर होण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती.

मिर्चीचा निकटवर्तीय असणाऱ्या आणि आरकेडब्ल्यू डेव्हलपरचा संचालक, सध्या अटकेत असलेला आरोपी रणजीतसिंग बिंद्रा याच्याशी झालेल्या व्वहारांची माहिती आणि कागदपत्रे इडीने मागितली होती. ती त्यांनी सादर केली. त्यांना मुंबई विमानतळाजवळील इडीच्या कार्यलयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांत इडीपुढे ते दुसऱ्यांदा हजर झाले.

30 ऑक्‍टोबर रोजी त्यांची इडीने नऊ तास चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी आपण मिर्चीला कधीही भेटलो नाही. तसेच त्यांना हवी असणारी सर्व काहदपत्रे देण्यास मी तयार आहे, असे कुंद्रा यांनी यापुर्वी सांगितले.

या प्रकरणात इडीने मुंबईस्थित इस्टेट एजंट धीरज वाधवान याची चौकशी केली. त्यानंतर फुफ्फुसाच्या विकारामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला सोडल्यानंतर इडीने चौकशी केली. तो बिंद्राचा मेव्हणा असूनब वरळीतील मिर्चीच्या तीन मालमत्तांच्या विक्रीत त्याचा एजंट म्हणून सहभाग होता, असे आढळून आल्याचे इडीचे म्हणणे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.