रांची – अंमलबजावणी संचालनालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर जमीन बळकावण्याच्या प्रकरणात जे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण दाखल केले आहे त्यात आज आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे अंतू तिर्की, प्रिया रंजन सहाय, बिपीन सिंग आणि इर्शाद अशी आहेत.ईडीने मंगळवारी तिर्की आणि इतर काहींच्या परिसरात झडती घेतली आणि त्यांच्या चौकशीनंतर चौघांना अटक करण्यात आली.
तिर्की यांचा सोरेनशी संबंध असल्याचा आरोप आहे तर सिंग हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. या अटकेमुळे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या आठ झाली आहे. सोरेन यांच्या विरुद्धचा आरोप रांचीमधील 8.86 एकर भूखंडाशी संबंधित आहे हा भुखंड सोरेन यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला आहे असा ईडीचा आरोप आहे.