शिराळा: सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवसात नवीन 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 841 वर पोहोचली आहे.
महापालिका क्षेत्रात बुधवारी 68 व गुरुवारी रात्री पर्यंत 29 रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागातही बुधवारी 7 व गुरुवारी 33 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
सांगली जिल्ह्यात आज उपचार सुरु असलेले 396 रुग्ण आहेत. तर 420 रुग्ण बरे झाले आहेत. 25 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 21 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून आज जिल्ह्यात 15 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
- आतापर्यंत ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या-552
- शहरी भागातील रुग्ण संख्या -68
- महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण -221
तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे
आटपाडी 76, जत 97, कडेगाव 45, कवठेमहांकाळ 25, खानापूर 27 , मिरज 52 , पलुस 57, शिराळा 146, तासगाव 25, वाळवा 70, महानगरपालिका क्षेत्र 221, अशी झालेली आहे.
शिराळा जत वाळवा रुग्णसंख्या अग्र क्रमांकावर असून त्यात फारसा बदल झालेला नाही याउलट वाढ होताना दिसत आहे. महापालिका क्षेत्र ही आता उच्चांक गाठू लागले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याची चिंता वाढली आहे.