#INDvENG 4 th Test : इंग्लंडचा डाव आटोपल्यानंतर भारताची अडखळत सुरूवात

अहमदाबाद –  भारत विरूध्द इंग्लंड दरम्यानच्या चौथ्या कसोटीलीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दिवसअखेर 1 बाद 24 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही 181 धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पूजारा15 तर  रोहित शर्मा 8 धावांवर खेळत होते. शुभमन गिलच्या रूपात भारताने पहिली विकेट गमावली. गिल शून्यावर बाद झाला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारलेल्या इंग्लंड संघाने भारतीय संघाच्या फिरकीसमोर पुन्हा एकदा लोटांगण घातलं आहे. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात 205 धावसंख्येवर रोखले. 

इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. तर ओली पोपने 29 आणि जॉनी बेयरस्टो 28 धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत अक्षर पटेलने सर्वाधिक 4 , अश्विनने 3 विकेट्स, मोहम्मद सिराजने 2 आणि सुंदरने 1 विकेट घेतली.

धावफलक –

भारतीय फलंदाजी पहिला डाव : 1 बाद 24 (12.0 षटक) – शुभमन गिल 0(3), रोहित शर्मा 08*(34), चेतेश्वर पूजारा 15*(36).

इंग्लंड गोलंदाजी पहिला डाव –  जेम्स अँडरसन 01/05(5.0)

इंग्लंड फलंदाजी पहिला डाव – सर्वबाद 205(75.5) – डॉम सिब्ले 02(08), जॅक क्रॉले 09(30), जॉनी बेयरस्टो 28(67) , जो रूट 05(09), बेन स्टोक्स 55(121), ओली पोप 29(87), डी लॉरेन्स 46(74), बेन फोक्स 01(12), डॉमनिक बेस 03(16), जॅक लीच 07(17), आणि जेम्स अँडरसन 10(15).

भारतीय गोलंदाजी (पहिला डाव) – अक्षर पटेल 68/4(26.0), आर. अश्विन 47/3(19.5), वाॅश्गिंटन सुंदर 14/1(7.0), मोहम्मद सिराज 45/2(14.0)

दरम्यान, चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. भारतासाठी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या दृष्टीने हा महत्वाचा सामना आहे. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजेचे आहे. अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत स्थान मिळवेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.