करोना लस घेतलेल्या महिलांच्या छातीत गाठी तयार होण्याच्या केसेस; तज्ज्ञ म्हणतात…

नवी दिल्ली – जागतीक पातळीवर करोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. करोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात करोना लस तयार करण्यासाठी संशोधन करण्यात येत होते. यात अनेक देशांना यश आले. त्यानुसार लसीकरणही सुरू झाले. दररोज जगभरात लाखो लोकांना लस देण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या लसी संदर्भात काही ठिकाणांहून साईडइफेक्टचे वृत्त येत आहे.

अनेक देशांमध्ये लसीकरणासाठी टप्पे ठरवण्यात आले आहे. यानुसार आरोग्य कर्मचारी, वृद्ध, महिला असा क्रम लावण्यात आला आहे. लसीकरण सुरू असताना डॉक्टरांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, लस घेतल्यानंतर काही महिलांच्या स्तनामध्ये गाठी तयार होत आहेत. ही बाब चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.

अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या गाठी शरीरातील लिम्फ नोड्समध्ये तयार होत आहे. लिम्फ नोड वाहिन्यांचा एक प्रकार आहे. त्यामुळे किटाणूंची छाणणी होते. महिल्यांनी ज्या बाजुच्या हातावर लस घेतली, त्याच बाजुला छातीत गाठ दिसून येत असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मॅमोग्राममध्ये लस घेतल्यानंतर अनेक महिलांना गाठीचा त्रास सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या गाठींमुळे ब्रेस्ट कॅन्सरची भीती वाढत असल्याचे समोर आले आहे. छातीचं परिक्षण करण्यासाठी मेमोग्रामचा वापर करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आवाहन केलं की, महिलांनी लस घेतल्यानंतर किमान चार आठवडे मेमोग्रामसाठी रुग्णालयात जावू नये.  लिम्फ नोड्समध्ये गाठ किंवा सूज येण्याची शक्यता बीसीजीची लस, फ्लूची लस घेतल्यानंतरही असते, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र करोना लस कोणत्या हातात घ्यायची, कधी घ्यायची याची माहिती मिळायला हवी, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.