IND vs AUS 1st T20 Visakhapatnam : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना आज (23 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभव विसरून नवीन सुरुवात करू इच्छित आहे. भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे.
स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल, ऋतुराज गायकवाड आणि टिळक वर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत मोठे विक्रम करू शकतात. अक्षर आणि ऋतुराज प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे तर टिळक वर्माला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
Axar Patel : 2 विकेट घेताच करेल ‘ही’ कामगिरी,दुखापतीनंतर पुनरागमन…
अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत आणखी दोन विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण करेल. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी कसोटीत 50, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 54 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 39 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने 2015 मध्ये भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो संघातून आत-बाहेर होत राहिला.
आशिया कप 2023 मध्ये अक्षर पटेलला दुखापत झाली होती. याच कारणामुळे त्याला विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली. तो देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला. आता तो दुखापतीतून बरा होऊन टीम इंडियात परतला आहे. तो उत्कृष्ट गोलंदाजी करणारा खेळाडू आहे. याशिवाय खालच्या फळीत तो आक्रमक फलंदाजी करतो.
Tilak Varma : टिळक वर्मा याने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1,937 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने आणखी 63 धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करेल. टिळक याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी केली होती. याच कारणामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली.
Ruturaj Gaikwad : गायकवाड करू शकतो ‘हा’ विक्रम…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. जर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी तीन षटकार मारले तर तो टी-20 क्रिकेटमधील (T20 international, First Class, List A) 150 षटकार पूर्ण करेल. गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओपनिंग करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
Approaching Milestones :
नॅथन एलिसला (148) टी-20 मध्ये 150 विकेट्स पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची गरज
अॅडम झम्पा (247) याला 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी तीन विकेट्स आवश्यक
मॅथ्यू वेडला (47) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50 झेल पूर्ण करण्यासाठी तीन झेलची आवश्यकता
तनवीर संघा (47) टी-20 सामन्यात 50 विकेट्स पूर्ण करण्यापासून तीन विकेट्स दूर
ग्लेन मॅक्सवेल (146) टी-20 क्रिकेटमध्ये 150 विकेट्स गाठण्यापासून चार विकेट्स दूर
ट्रॅव्हिस हेडला (94)) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी सहा षटकारांची गरज
ग्लेन मॅक्सवेल (443) ला टी-20 मध्ये 450 षटकार पूर्ण करण्यासाठी सात षटकारांची आवश्यकता
मार्कस स्टॉइनिस (4960) ला टी-20 फॉरमॅटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 40 धावांची गरज
T20 मालिकेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.