sanjeeda sheikh – ‘क्या होगा निम्मो का’, ‘कयामत’ आणि ‘इश्क का रंग सफेद’ यांसारख्या हिट टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली संजीदा शेख (sanjeeda sheikh) हे आज टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. संजीदाची (sanjeeda sheikh) गणना टीव्हीच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. बोल्ड अवतार, हटके स्टाइल आणि फिटनेसमुळे अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते.
संजीदा सोशल (sanjeeda sheikh) मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच सक्रिय असते. संजीदाचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. अशात तिने टाकलेले काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
आपल्या किलर एक्स्प्रेशन्समुळे चर्चेत असलेल्या संजीदाने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. संजीदाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री पारदर्शक पोशाखात दिसत आहे. लाल रंगाच्या ब्रॅलेटसह काळ्या रंगाचा पारदर्शक डॉट्स टॉप घातला आहे.
यासोबत तिने मॅचिंग लाँग स्कर्टही कॅरी केला आहे. या फोटोंमध्ये संजीदा तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. संजिदाचे सौंदर्य पाहून चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत आणि या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत…
संजीदा शेखही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत होती. वर्षाच्या सुरुवातीला या अभिनेत्रीचे नाव बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत जोडले जात होते. त्यांच्या सफारीचा एक फोटो समोर आला.
दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची बातमी देखील समोर आली होती. संजीदाने ‘तैश’ चित्रपटाच्या सेटवर हर्षवर्धन राणे यांची भेट घेतली होती. या सेटवरूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.