CSK New Captain : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. याआधी चेन्नई सुपर किंग्जने संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल केला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.
ऋतुराज हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता महेंद्रसिंग धोनी संघाचे नेतृत्व करणार नाही. धोनी दीर्घकाळ संघाचा कर्णधार राहिला. धोनी आयपीएल 2008 पासून संघासोबत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. CSK ने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले. सीएसकेने गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईने हा सामना 5 विकेटने जिंकला.
संघाच्या कर्णधारपदावर CSK काय म्हणाले?
चेन्नई सुपर किंग्सने संघाच्या कर्णधारपदाबाबत एक निवेदन जारी केले आहे. CSK ने म्हटले आहे की, “महेंद्रसिंग धोनीने IPL 2024 पूर्वी संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे.” ऋतुराज 2019 पासून संघाशी संबंधित आहे. त्याने आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत.”
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
फोटोशूटला धोनीची अनुपस्थिती…
धोनीने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कर्णधारांच्या फोटोशूटला हजेरी लावली नाही. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड दिसला, तेव्हापासून CSK च्या कर्णधार बदलाची चर्चा होती. गुरुवारी आयपीएलने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये पुष्टी केली की, धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे.
पंजाब किंग्जनेही घेतला मोठा निर्णय…
त्याचबरोबर आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी पंजाब किंग्जनेही मोठा निर्णय घेत जितेश शर्माला संघाचा उपकर्णधार बनवले आहे. शिखर धवनच्या जागी तो कर्णधारांसोबत फोटोशूट करताना दिसला.
𝐈𝐭’𝐬 𝐒𝐡𝐨𝐰𝐓𝐢𝐦𝐞!
The #TATAIPL is here and WE are ready to ROCK & ROLL 🎉🥳🥁
Presenting the 9 captains with PBKS being represented by vice-captain Jitesh Sharma. pic.twitter.com/v3fyo95cWI
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2024
ऋतुराजची आयपीएल कामगिरी…
ऋतुराजची आयपीएल कामगिरी बघितली तर ती चांगली झाली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 52 सामन्यांमध्ये 1हजार 797 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. ऋतुराजची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 101 धावा आहे. गेल्या मोसमात त्याने 16 सामन्यात 590 धावा केल्या होत्या. ऋतुराजची या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या 92 धावा होती. चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात या युवा खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऋतुराजने 2020 मध्ये पहिल्यांदा आयपीएल सामना खेळला. त्याला या मोसमात 6 सामने खेळण्याची संधी मिळाली.
धोनी होऊ शकतो निवृत्त…
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवटचा सीझन खेळताना दिसणार आहे. अचानक कर्णधार बदलल्यानंतर तो या मोसमानंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 42 वर्षीय खेळाडूने 212 सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व केले आहे. त्याच्याशिवाय सुरेश रैनाने पाच सामन्यांत संघाचे नेतृत्व केले असून रवींद्र जडेजाने आठ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे.
याआधीही सीएसकेच्या कर्णधारपदात झाला आहे बदल…
धोनीने ही जबाबदारी झटकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही आणि संघाला साखळी सामन्यांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले.