CSK New Captain : महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. IPL 2024 मध्ये CSK चा कर्णधार म्हणून रुतुराज ( Ruturaj Gaikwad ) दिसणार आहे. सीएसकेने अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. चेन्नईच्या कर्णधारपदी धोनीशिवाय दुसरे कोणी असेल अशी ही दुसरी वेळ आहे. धोनीने यापूर्वी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. पण जडेजाने ( Ravindra Jadeja ) ही जबाबदारी धोनीकडे परत केली होती.
कर्णधारपद सोडण्यामागे ‘हे’ असू शकते कारण….
वास्तविक धोनी ( Mahendra Singh Dhoni ) 42 वर्षांचा आहे आणि तो बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे. त्याने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता तो आयपीएलमधूनही निवृत्ती घेऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या मोसमात धोनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकतो. मात्र, गेल्या मोसमात त्याला निवृत्तीबाबत विचारले असता त्याने निवृत्तीबाबत कोणतेही संकेत दिले नव्हते. पण आता तो निवृत्त होऊ शकतो. याच कारणामुळे त्याने ऋतुराजकडे कर्णधारपदही सोपवल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे मत आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा विक्रम उत्कृष्ट आहे. CSK 2008 मध्ये अंतिम फेरीत सहभागी झाली होती. यानंतर 2010 आणि 2011 मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले. 2012 मध्येही हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. चेन्नईने 2012 आणि 2013 मध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड केले होते. चेन्नईने 2015 चा अंतिम सामना खेळला होता. मात्र यामध्ये मुंबई इंडियन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर त्याने 2018, 2021 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले.
धोनीने आयपीएलच्या पदार्पणात 414 धावा केल्या होत्या. त्याने 2008 मध्ये 16 सामन्यात 2 अर्धशतके झळकावली होती. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 5082 धावा केल्या आहेत. धोनीने या स्पर्धेत 24 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 84 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
याआधीही सीएसकेच्या कर्णधारपदात झाला आहे बदल…
धोनीने ही जबाबदारी झटकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही आणि संघाला साखळी सामन्यांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले.