India vs Afghanistan 2nd T20 Live Cricket Match Result : यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे व विराट कोहली यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान भारताने १५.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
अफगाणिस्तानने विजयसाठी दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर मात्र, विराट कोहली व यशस्वी जयस्वालने अर्धशतकी भागादीरी करताना वादळी फलंदाजी केली. त्यांनी चौकार व षटकारांचा पाऊस पाडत अफगाणिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. कोहली आती आक्रकम खेळ करण्याच्या प्रयत्नात १६ चेंडूत ५ चौकारांसह २९ धावा करुन बाद झाला. या वेळी आलेल्या शिवम दुबेने जयस्वालसह आक्रमक फटकेबाजी करत संघाचे दीडशतक फलकावर लावले.
For his bowling figures of 2/17, Axar Patel is adjudged Player of the Match as #TeamIndia win the 2nd T20I by 6 wickets.
Scorecard – https://t.co/CWSAhSZc45 #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/ectnmGEfN7
— BCCI (@BCCI) January 14, 2024
अर्धशतक पूर्ण करणारा जयस्वाल ६८ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने ३४ चेंडूत ५ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. जयस्वालच्या जागी आलेल्या जीतेश शर्माने निराशा केली. दरम्यान दुबेनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी रिंकू सिंग फलंदाजीला आला. त्याने दुबेला साथ देत संघाच्या विजायवर शिक्कामोर्तब केले. दुबे ६३ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने ३२ चेंडूत ५ चौकार व ४ षटकार फटकावले. रिंकूने ९ चेंडूत एका चौकारासह नाबाद ९ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून कीम जनतने सर्वाधिक २ बळी मिळवले.
#INDvAFG 2nd T20 : गुलबदीनची फटकेबाजी, अफगाणिस्तानचे भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान..
तत्पूर्वी, गुलबदीन नईब, नजीब झद्रानसह अन्य फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावरअफगाणिस्तानने भारतासमोर दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयासाठी १७३ धावा करण्याचे आव्हान ठेवले. नईबने अर्धशतकी खेळी केली. अर्शदीप सिंगच्या डावातील अखेरच्या षटकात अफगाणिस्तानने चार फलंदाज गमावल्याने त्यांची धावसंख्या रोखण्याच भारताला यश आले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणफेक जिंकत अफगाणिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर रेहमनुल्लाह गुरबाज लवकर बाद झाला. त्यानंतर गुलबदीन नईबने कर्णधार इब्राहीम झद्रानसह संघाचा डाव सावरताना अर्धशतक फलकावर लावले. झद्रानही फारसा चमक दाखवू शकला नाही.
अजमतुल्लाह ओमरझाई व महंमद नबी यांनीही निराशा केली. त्यावेळी एका बाजूने नईब फटकेबाज करत धावसंख्या वाढवत होता. त्याने अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्यानंतर आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो ५७ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने ३५ चेंडूत ५ चौकार व ४ षटकार फटकावले. त्यावेळी फलंदाजीला आलेल्या नजीब झद्रानने २१ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांची वेगवान खेळी केली. त्याच्या खेळीमुळे संघाला शतकी मजल मारता आली. त्यानंतर तो बाद झाल्यावर आलेल्या करीम जनत व मुजीब उर रेहमान यांनी आक्रमक फलंदाजी केल्याने त्यांना दीडशतकी धावा फलकावर लावता आल्या.
#FIHOlympicQualifiers2024 : ‘करो या मरो’च्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय….
सामन्याचे अखेरचे षटक आत्यंत नाट्यमय ठरले. अर्शदीप सिंगने टाकलेल्या या षटकात अफगाणिस्तानचे चार फलंदाज बाद झाले. यापैकी दोन फलंदाजांना अर्शदीपने बाद केले. तर अखेरच्या दोन चेंडूंवर दोन फलंदाज धावबाद झाले. अफगाणिस्तानचा डाव १७२ धावांवर रोखला गेला. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक ३ बळी घेतले. अक्सर पटेल व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.