नवी दिल्ली – संदेशखळी येथे 5 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रविवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणातील अटकेची संख्या आता चार झाली आहे.
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचे नेते शाजहान शेख यांच्या चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यासाठी गेले असता ईडीच्या अधिकार्यांवर झालेल्या हल्ल्यात तीन अधिकारी जखमी झाले होते.
राज्यातील कथित रेशन वितरण घोटाळ्यात रविवारी एका आरोपीला नाझत येथील मत्स्यपालनातून, तर दुसऱ्याला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मिनाखा येथून अटक करण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.