India vs Afghanistan 2nd T20 Live Cricket Score and updates : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने मोहालीत पहिला T20 जिंकला होता. हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेण्यावर त्याची नजर आहे. कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारता विरुद्ध अफगाणिस्तानचा संघ 20 षटकात 172 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक 57 धावा केल्या. या खेळीत त्याने 35 चेंडूत 5 चौकार व 5 षटकार फटकावले. नजीबुल्ला झद्रानने 23, मुजीब उर रहमानने 21 आणि करीम जनातने 20 धावांचे योगदान दिले.
Four wickets fall in the final over as Afghanistan are all out for 172 runs in 20 overs.#TeamIndia chase underway.
Live – https://t.co/CWSAhSZc45 #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/uiAjfzf35O
— BCCI (@BCCI) January 14, 2024
रहमानउल्ला गुरबाज आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. कर्णधार इब्राहिम झद्रान आठ धावा करून बाद झाला तर अजमतुल्ला ओमरझाई दोन धावा करून बाद झाला. नूर अहमदने एक धाव घेतली. नवीन उल हक एक धाव घेत नाबाद राहिला. फजलहक फारुकीला खातेही उघडता आले नाही.
#INDvAFG 2nd T20 : भारताचा गोलंदाजीचा निर्णय! संघात 2 मोठे बदल, जाणून घ्या Playing 11….
भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. शिवम दुबेने एक विकेट घेतली.