India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना बरोबरीत सुटला आहे. सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आहे. अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावा करायच्या होत्या, पण संघाला 18 धावा करता आल्या आणि धावसंख्या बरोबरीची झाली. अफगाणिस्तानला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या, मात्र दोनच धावा करता आल्या.
Match Tied!
It’s a SUPER-OVER in Bengaluru folks!
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0Ded3KKIJI
— BCCI (@BCCI) January 17, 2024
भारताने 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. त्याचवेळी अफगाणिस्तान संघाला सहा विकेट्सवर २१२ धावा करता आल्या. गुलबदिन नायबने 23 चेंडूत नाबाद 55 धावांची तुफानी खेळी केली. आता दोन्ही संघ प्रत्येकी एक षटक खेळतील. प्रथम अफगाणिस्तान संघ फलंदाजी करेल आणि नंतर भारतीय संघ त्या धावांचा पाठलाग करेल.