नवी दिल्ली – करोना व्हायरस संदर्भातील सर्व निर्बंधाचा संपुष्टात आले असून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादन वेग घेत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर 19.6% इतका नोंदला गेला आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र 20.6 टक्क्यांनी वाढल्यामुळे औद्योगिक उत्पादनाला चांगलाच आधार मिळाला आहे. खाणक्षेत्राची उत्पादकता 11 टक्क्यांनी वाढली आहे तर वीज निर्मिती 23 टक्क्यांनी वाढली असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 27.6% नी वाढले होते. मात्र त्या अगोदर करोनामुळे औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीवर असल्यामुळे सध्या औद्योगिक उत्पादन आवश्यकतेपेक्षा जास्त भासत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. औद्योगीक उत्पादन अशाच प्रकारे वाढले तर त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असे विश्लेषकांनी सांगितले.