Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे मागच्या पाच दिवसापासून (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. आरक्षणासाठी अंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण 25 ऑक्टोबरपासून सुरू आहे.
अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांनीही सरकारने चर्चेला यावं, असं प्रतिआवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यातील अनेक संघटनांनी पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे.
अश्यातच, आता मराठा आरक्षणाला प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी देखील पाठिंबा दिल्याचं सांगण्यात आलं आहे. इंदोरीकर महाराज यांनी उद्यापासून पुढचे 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) पाठीशी असल्याचं यातून दिसून येत आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.