इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी

संगमनेर : निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांनी जानेवारी महिन्यामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी अंनिसने हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असून आज न्यायालय हस्तक्षेप याचिका अर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

सम तारखेला स्त्रीसंग झाला तर पुत्रप्राप्ती होते, असे जाहीर वक्तव्य किर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केले होते. त्यानंतर PCNDT कायद्याअंतर्गत संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. दिवाणी न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज तिसरी सुनावणी होणार आहे.

जानेवारी महिन्यात नवी मुंबईतल्या उरणमध्ये इंदोरीकरांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. PCPNDT कायद्याखाली व्यक्ती दोषी आढळला तर तीन ते पाच वर्षाची शिक्षा आणि 10 ते 50 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुणे जिल्ह्यातील उरण व नगर तालुक्यातील एका ठिकाणी आपल्या कीर्तनातून सम आणि विषम तिथीचे सूत्र मांडतांना त्यातून अपेक्षित संततीची प्राप्ती होते असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात इंदोरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.