नवी दिल्ली – “ग्लोबल साऊथ’मधील देशांना मदत म्हणून पर्यावरण आणि वातावरण बदलावर देखरेख करण्यासाठी “जी-20’उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव भारताच्यावतीने मांडण्यात आला आहे. “जी-20’च्या प्रांऱ्बीच्या सत्रामध्ये जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला.
“जी-20’उपग्रहाकडून मिळालेला डाटा चांद्रयानाकडून मिळालेल्या डाटाप्रमाणेच प्रमाणेच सर्व मानवजातीला फायदेशीर असेल. त्याच प्रमाणे “जी-20′ वातावरण बदल निरीक्षणासाठीच्या उपग्रह मोहिमेचा प्रस्ताव भारताकडून मांडला जातो आहे, असे मोदी म्हणाले.
या उपग्रहाकडून मिळालेली माहिती “ग्लोबल साऊथ’मधील सर्व देशांना वितरीत केली जाईल. या प्रस्तावाचे “जी-20’च्या सर्व सदस्यांनी स्वागत करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.