काबुल – अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी वेगानं प्रयत्न सुरु आहे. भारतात आज सकाळी हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान काबूलहून 107 भारतीयांसह एकूण 168 प्रवाशांना घेऊन राजधानी दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचले. यापूर्वी 87 भारतीयांना घेऊन दोन विमाने रविवारी दिल्लीला पोहोचली आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पैकी काही भारतीय हे ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथून भारतात परतले आहे तर काही काबूलहून भारतात परतले आहे. ज्यामध्ये १९७ भारतीय आणि काही २० अफगान शीख व हिंदू सहभागी होते. भारतात पोहचताच त्यांनी भारतात माता कि जय म्हणत घोषणा दिल्या.
यात अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंह खालसा हे देखील C-17 विमानातील २३ अफगाणी शीख नागरिकांमध्ये सहभागी आहेत.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.