अक्षय कुमारचा “बेलबॉटम’ रिलीज होऊन दोन दिवस होऊन गेले आहेत. गुरुवारपासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
शुक्रवारीदेखील सिनेमाचे कलेक्शन 2.75 कोटी इतके होते. अजूनही त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीच्या आठवड्यात आणखीन थोडे जास्त कलेक्शन असते तरी चालले असते.
सिनेमा रिलीज झाला तेंव्हा आठवड्याचे कामाचे दिवस सुरू होते. आता तर खरा वीक एन्ड सुरू झाला आहे. त्यामुळे “बेलबॉटम’चे कलेक्शन आणखीन वाढण्याची शक्यता आहे. करोनाच्या लॉकडाऊननंतर प्रथमच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही म्हणावा तसा वाढलेला दिसत नाही.
खरी गोष्ट म्हणजे “बेलबॉटम’ ओटीटीवर रिलीज न होता थिएटरमध्ये रिलीज झाला आहे, हेच प्रेक्षकांना अजून माहिती नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा अजून म्हणावा तसा प्रतिसाद अक्षयच्या या सिनेमाला मिळालेला नाही.
अजूनही “बेलबॉटम’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे, अशी चौकशी लवकर करत आहेत. काहीही कारण असले तरी “बेलबॉटम’ला सुरूवातीला थोडा ठंडा प्रतिसाद मिळाला आहे, हे मात्र खरे आहे.