FIH Pro League 2024 : अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग हा भुवनेश्वर आणि राउरकेला येथे होणाऱ्या FIH प्रो लीग सामन्यांमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार असेल. मिडफिल्डर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. हॉकी इंडियाने गुरुवारी दुहेरी टप्प्यातील सामन्यांसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली.
भुवनेश्वर येथील पहिला टप्पा 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुरू होईल तर राउरकेला येथील दुसरा टप्पा 19 ते 25 फेब्रुवारीपर्यंत असेल. भारतीय संघ आयर्लंड, नेदरलँड्स, स्पेन आणि ऑस्ट्रेलियाशी प्रत्येकी दोन वेळा खेळणार आहे. पहिला सामना 10 फेब्रुवारीला स्पेनविरुद्ध होणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघाचा भाग असलेले स्ट्रायकर बॉबी धामी आणि गोलरक्षक पवन यांचा भारतीय संघाला समावेश करण्यात आलेला नाही. गोलकिपिंग पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक सांभाळतील.
भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टोन म्हणाले, ‘आम्ही अतिशय संतुलित संघ निवडला आहे ज्यात अनुभवी आणि युवा खेळाडू आहेत. एक युनिट म्हणून चांगली कामगिरी करणे हे आमचे ध्येय आहे. अव्वल संघांविरुद्ध स्वत:चे मूल्यमापन करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
🔴 SQUAD ANNOUNCEMENT 🔴
Here’s our India Men’s Team for the Bhubaneswar and Rourkela leg of the FIH Pro League 2023/24. 🇮🇳
India will face Spain, Netherlands, Australia and Ireland.
Stay tuned for more updates from the FIH Pro League!🏑
Details you don’t want to miss:… pic.twitter.com/n8XUWT2Mqq
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2024
भारतीय हाॅकी संघ :-
गोलरक्षक : पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक.
बचावपटू : हरमनप्रीत, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुमित, संजय, जुगराज सिंग आणि विष्णुकांत सिंग.
मिडफिल्डर : हार्दिक, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, राजकुमार पाल, नीलकांत शर्मा आणि रबिचंद्र सिंग मोइरेन्थेम.
फॉरवर्ड : ललित उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग, सुखजित सिंग, अभिषेक, आकाशदीप सिंग आणि अरिजित सिंग हुंदल.