IPL 2024 (RR vs KKR Match 70) : गुवाहाटी येथे होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आयपीएल 2024 चा हा शेवटचा लीग सामना होता. हा सामना रद्द झाल्यानंतर राजस्थान आणि कोलकाताला प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे. आता प्लेऑफचे समीकरण बदलले आहे.
या सामन्यात नाणेफेक झाली, ज्यामध्ये केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने विजय मिळवला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांमध्ये 7-7 षटकांचा सामना निश्चित करण्यात आला. संघ खेळण्यासाठी मैदानात येण्यापूर्वीच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
साखळी टप्प्यातील शेवटचा सामना पुन्हा सुरू व्हावा यासाठी सामना अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र सततच्या पावसामुळे अखेर सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. यासह आयपीएल 2024 चा लीग टप्पा संपला आहे.
Next Stop 👉 Ahmedabad! ✈️
𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝗳𝗶𝗲𝗿 𝟭 calling 💜🧡
Kolkata Knight Riders 🆚 Sunrisers Hyderabad#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | @KKRiders | @SunRisers pic.twitter.com/NvGURFEmnz
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे. ती आता आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआरचा सामना हैदराबादशी होणार आहे.