FIH Pro League 2024 (Indian MensTeam) : भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी एफआयएच प्रो लीग 2023-24 मध्ये आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला. भारत विरुद्ध आयर्लंड हा सामना कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर येथे झाला. या सामन्यात भारताकडून एकमेव असा विजयी गोल गुरजंत सिंगने (60व्या मिनिटाला) केला.
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यात दोन्ही संघांनी सामन्याची आक्रमक सुरुवात केली आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताने तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण अकराव्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंडच्या बचावासमोर या संधीचा फायदा घेण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. त्याचवेळी हरमनप्रीत सिंग अँड कंपनीच्या उत्कृष्ट बचावासमोर आयर्लंडच्या खेळाडूंना गोल करण्याची एकही संधी मिळाली नाही. अशाप्रकारे पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आले नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये, भारतीय हॉकीपटूंनी आपले आक्रमण तीव्र केले आणि 20व्या आणि 24व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले , परंतु खेळाडूंना त्यांचे विरोधी गोलपोस्टमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. त्यामुळे हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
60th-minute magic! 🏑✨
Catch glimpses of yesterday’s thrilling victory Of India over Ireland during Bhubaneswar leg of the FIH Pro League 2023/24.
#HockeyIndia #IndiaKaGame #FIHProLeague24 #IndianMensTeam
.
.
.
.@CMO_Odisha @FIH_Hockey @Media_SAI @sports_odisha @IndiaSports pic.twitter.com/0UFSAh2Usp— Hockey India (@TheHockeyIndia) February 17, 2024
सामन्याच्या 42 व्या मिनिटाला भारताने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि आकाशदीपने बॉल अमित रोहिदासकडे पास केला, पण विरोधी गोलरक्षक कैर याने तो सहज वाचवला. भारतीय खेळाडूंनी गोल करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि 46व्या आणि 51व्या मिनिटाला आणखी दोन पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण आयरिश बचावासमोर भारतीय संघाला कोणतेही यश मिळाले नाही.
भारत विरुद्ध आयर्लंड सामना अधिकच रोमांचक तेव्हा झाला जेव्हा शेवटच्या क्षणी (60 व्या मिनिटाला) गुरजंत सिंगने विरोधी खेळाडूंना चकमा देत मैदानी गोल करत भारताला विजयी मार्गावर नेले. दुसरीकडे संपूर्ण सामन्यात भारतीय बचावफळीसमोर आयरिश खेळाडू हतबल दिसत होते.
#FIHProLeague24 : भारतीय संघाने शूटआऊटमध्ये गतविजेत्या नेदरलँड्सचा केला पराभव…
अशा प्रकारे भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडविरुद्ध 1-0 असा विजय मिळवला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा पुढील सामना सोमवारी स्पेनविरुद्ध होणार आहे.